Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा टाटा धरणातील पाण्याचा विसरर्ग वाढण्याचा अंदाज...टाटा कंपनीकडून सतर्कतेचा इशारा !

लोणावळा टाटा धरणातील पाण्याचा विसरर्ग वाढण्याचा अंदाज…टाटा कंपनीकडून सतर्कतेचा इशारा !

लोणावळा : लोणावळा शहरात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्व् भूमीवर लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आज लोणावळा टाटा धरणातील पाणी साठ्याची पाहणी केली.

लोणावळा धरण टाटा कंपनीच्या लोणावळा धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होत आहे . आज मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत लोणावळा धरणाची जलाशय पातळी 623.98 मीटर इतकी झाली असून धरण 60.74 % इतके भरले आहे . धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचा कल पाहता पुढील 48 तासांमध्ये धरणाच्या द्वारा विरहित सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात नदीपात्रात विसर्गास सुरुवात होऊ शकते असा इशारा टाटा पॉवर कंपनीने दिला आहे.

लोणावळा धरणाच्या सांडव्यातून पाणी इंद्रायणी नदीपात्रात येण्यास सुरुवात झाल्यास लोणावळा शहरातील हुडको , भांगरवाडी , नांगरगाव आदी भागात पूर परिस्थिती निर्माण होते . त्यामुळे हा विसर्ग टाळण्याकरिता कंपनी कडून धरणातील जास्तीत जास्त पाणी खोपोली वीजनिर्मिती केंद्राकडे पाठवण्यात येत आहे . मात्र पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने टाटा धरण व्यवस्थापन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.तरी , इंद्रायणी नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये आणि नदीपात्रामध्ये जनावरे , शेत पम्प , अवजारे आणि इतर तत्सम साहित्य तात्काळ काढून घेण्यासंबंधी सूचना आपले स्तरावरून सर्व नागरिकांना देण्यात याव्यात अशा सूचना लोणावळा नगरपरिषद , लोणावळा पोलीस , तहसीलदार , आजूबाजूच्या ग्रामपंचायत यांना टाटा धरण व्यवस्थापना कडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page