लोणावळा (प्रतिनिधी ) : आपण समाजाचे काही देणे लागतो आणि केवळ टॅक्सी चालवून आपले आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे आणि त्यातून समाजासाठी थोडे का होईना मात्र आपलं स्वतःचे योगदान दिले जावे या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटने तर्फे कोथुर्णे गावातील पिडीत चांदेकर कुटुंबांला 65 हजारांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली .
कोथुर्णे गावात पंधरा दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तीच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती . याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र पिडित कुटुंब हे गरिब असल्याने त्यांना न्यायालयीन लढाईसाठी व उदरनिर्वाहासाठी मदतीची गरज असल्याने अनेक दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्था पुढे येत आहेत.याच कारणास्तव लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटना देखील पुढे सरसावली आणि या कुटुंबाला शक्य तेवढी मदत करण्याचे निश्चित केले.
संघटनेच्या सदस्यांनी जमा केलेली रक्कम बुधवारी सकाळी या पीडित कुटुंबाच्या हवाली करण्यात आली . यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल शेडगे , खजिनदार मंगेश कदम , अविनाश तिकोणे , नरेंद्र निकाळजे , फिरोज शेख , लक्ष्मण दाभाडे , संजय मावकर , विठ्ठल मंदरूपकर , किशोर पवार , बाळू विटकर , गणेश कडू , सुधीर कोकाटे , विशाल साठे , अभिजित मातेरे , मयूर गाडे , सोमनाथ केदारी , नितीन डिंगणकर , दुर्गेश देवकर हे सर्व सभासद उपस्थित होते . पीडित चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी तिच्या कुटुंबाने सुरू केलेल्या लढ्यात लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य त्यांच्या सोबत असतील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.