if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : तुंगार्ली येथील एका बंगल्यात पैशांची दर्शनी किंमत असलेल्या कॉइनचा वापर करत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १४ आरोपींवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी मुंबई भागातील आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विकास कदम यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तुंगार्लीतील एका सोसायटीमधील बंगल्यात ही घटना घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तेथे छापा टाकण्यात आला असता, मुंबईतील १४ जणांचा एक ग्रुप तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करत आहेत.