Friday, December 27, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगपरिषद प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण..

लोणावळा नगपरिषद प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण..

ऍड. संजय पाटील, अध्यक्ष लोणावळा शहर पत्रकार संघ, (संपादक “मावळ नागरिक ” )

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार व नगराध्यक्षा सुरेखा जाधव ह्यांच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.त्यात एका दिवसात 2000 लोकांच्या चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशा प्रकारे संपूर्ण लोणावळ्याचे चेकअप करणार आहे आणि यातुन संशयीत आढळल्यास वा तशी लक्षणे दिसल्यास त्वरित क्वॉरान्टाईन करण्यात येईल. शिवाय पुढील उपचार झालावाडी, समुद्रा इन्स्टिट्यूट येथील क्वॉरांटाईन सेंटर किंवा घरीच होम क्वॉरांटाईन करण्याचे ठरवले आहे . हे पालीका प्रशासनाला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल.
हेच सुरुवातीपासून केले असते तर लोणावळ्याच्या जनतेसाठी सर्वच कामात मग ते सामाजिक असो, राजकीय असो वा सांस्कृतीक क्षेत्र असो यामध्ये अग्रेसर असणारे जेष्ठ पत्रकार व आमचे स्नेही दत्तात्रय गवळी, माजी नगरसेवक बाळू कडू, सखाराम पोटफोडे, डॉ. अभय कुलकर्णी अशा अनेक मान्यवर व जवळच्या मित्रांना गमवावे लागले नसते . आधीच लोणावळ्यात हॉस्पीटलची व्यवस्था नाही हे माहीत असतांना जवळचे मित्र गेल्यावर सदर शहाणपन सुचले आहे . हा दिखावा पण किती यशस्वी होतो हे तर काळच ठरवेल.
पाचदिवस क्वॉरांटाईन केलेल्या विद्यमान नगरसेविकेची विचार पुस करून साधी चौकशी सुध्दा केली जात नाही तर सामान्य नागरिकांची काय गत असेल ह्याचा विचार न केलेलाच बरा . कोरोना केअर सेंटर ला धड सुविधा नाहीत . अॅम्बुलन्सची सोय नाही पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत आणि दररोज 2000 लोकांची तपासणी करणार तेव्हा पॉजीटिव्ह रूग्णांकडे कोण बघणार, एवढी मॅनपॉवर कशी उभारणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आम्ही अनेक वर्षे साप्ताहिक मावळ नागरिकच्या माध्यमातून लोणावळेकरांसाठी असलेले नगरपरिषदेचे रूग्णालय सुरू करण्याच्या अनेकदा बातम्या देवूनही गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने लक्ष दिले नाही . आता लोणावळेकरांनी आपल्या लाडक्या माणसांना हरवल्यावर जाग आली आहे . म्हणून प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपन म्हणावे लागेल .यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि लोणावळेकरांसाठी सुसज्ज रूग्णालय लवकरात लवकर सुरू करतील अशी अपेक्ष.
- Advertisment -

You cannot copy content of this page