लोणावळा : लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय लोणावळा, लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा व लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय खंडाळा या तीनही नगरपरिषद विद्यालयाचा इयत्ता 10 च्या 2022 परीक्षेचा निकाल 100% लागला असून यात मुली आघाडी वर आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला . मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इ.10 वी. परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
मार्च 2022 एस.सी.परीक्षेसाठी लोणावळा नगरपरिषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयातील 41 विध्यार्थी प्रविष्ठ होते. त्यामध्ये विध्यार्थी 18 तर 23 विध्यार्थिनी असे एकूण 41 विध्यार्थांचा समावेश होता. यावेळी शाळेतील सर्व विध्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 100% लागला आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षी प्रथम तीन क्रमांक हे मुलींनीच मिळविले आहेत.यामध्ये सैफी सलीम खान हिने 80.80% गुण मिळवून शाळेत प्रथम आली, द्वितीय क्रमांकावर सबिया सरवरे आलम खान हिने 80.40% गुण मिळविले तर शिफा जमीर पटेल हिने 80.20% गुण मिळवून नाव लौकिक केले आहे तसेच लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा या शाळेतून मार्च 2022 एस.एस.सी. परिक्षेस प्रविष्ठ असलेले 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने शाळेचा निकाल 100 % लागला आहे.शाळेत सर्वाधिक गुण प्राप्त करून कु . नाजुका गणेश गायकवाड हिने 84.80% प्रथम क्रमांक मिळविला असून कु . रेश्मा मंगेश जाधव हिने 82.60% गुण मिळवून शाळेत द्वितीय तर कु . सानिया मिलाल मुल्ला हिने 76.20% गुण प्राप्त करून शाळेत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय व लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा या शाळांमधील मुलींनी यंदा सर्वाधिक गुण प्राप्त करून बाजी मारली आहे.