Sunday, June 1, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषदेतून दिव्यांगांसाठी ₹71.40 लाखांचा निधी वाटप..

लोणावळा नगरपरिषदेतून दिव्यांगांसाठी ₹71.40 लाखांचा निधी वाटप..

प्रतिनिधी: श्रावणी कामत

लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी आर्थिक मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील 238 नोंदणीकृत दिव्यांगांना एकूण ₹71.40 लाखांचा निधी वितरित करण्यात आला. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात थेट ₹30,000 जमा करण्यात आले.
नगरपरिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे, पत्रकार विशाल पाडाळे, विशाल विकारी, संजय पाटील, सुनील म्हसके, सागर शिंदे तसेच लेखा विभागाचे लेखापाल निलेश काळे, सतिश गावडे, दिव्यांग निधी विभागाच्या सुनिता जाधव, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर, कर्मचारी बबन कांबळे आणि अनंता टेमघरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राऊत यांनी केले. मदतीचा निधी थेट खात्यात जमा झाल्याने लाभार्थ्यांनी नगरपरिषदेचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page