लोणावळा : लोणावळा नगरपरिषद इमारतीच्या पार्किंग मध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये असलेल्या शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता होत नाही, याठिकाणी हात धुण्यासाठी असलेल्या वॉश बेसिन मधील नळाला पाणी नाही अशी दुरावस्था असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशस्त इमारतीच्या पार्किंग मधील बाथरूमची दैनिय अवस्था असल्यामुळे नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कोणाचा ताबा नाही का? जर इमारतीच्या बाथरूमची ही अवस्था असेल तर नगरपरिषदेच्या इतर शौचालयाची काय अवस्था असेल याची नवनिर्वाचित मुख्याधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.