लोणावळा (प्रतिनिधी): एकात्मिक बाल विकास सेवा योजना पिंपरी -2 अंगणवाडी विभाग लोणावळा अंतर्गत, लायन क्लब ऑफ डायमंड लोणावळा च्या सहकार्याने राष्ट्रिय पोषण सप्ताह निमित्त दि. 30 सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाणे साजरा करण्यात आला.
त्या अंतर्गत लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक व प्राथमिक शाळा भांगरवाडी येथे सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांसाठी, तसेच पालक वर्गासाठी विविध स्पर्धा व मार्गदर्शन आणि महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करून लहानांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी विभाग लोणावळा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना पिंपरी व लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात एक ते सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांसाठी सदृढ बालक स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.तसेच यावेळी महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले तर महिला व पुरुष यांच्या साठी पाक कला अशा विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून अंगणवाडी विभाग लोणावळा यांच्या वतीने समाज प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळाच्या वतीने सर्व स्पर्धातील स्पर्धाकांना पारितोषिक वाटप व कॅन्सर आजारावर मार्गदर्शन करून सर्व अंगणवाडी सेविकांना कापडी बॅगचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .अंगणवाडी लोणावळा विभागाने केलेले कार्य उल्लेखनीय असून या दरम्यान पालक वर्ग , गर्भवती , स्तनदा, किशोरी व सहा वर्ष वयापर्यंतची बालके यांच्यासाठी मार्गदर्शन , माहीती , अंगणवाडीचे महत्व , वजन , उंची , संनियंत्रण , सुदृढ बालक स्पर्धा यातून अंगणवाडीच्या कामाविषयी जागरूकता निर्माण होऊन महत्व पटले असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी अंगणवाडी विभागाच्या सुपरवायझर अर्चना राहींज, शाहीन आरकाटी, वंदना कारके आदींसह,लायन्स क्लब ऑफ डायमंड च्या सिनियर पर्सन मेंबर सिमा शिंदे , सिनियर मेंबर विना परमार , सिनियर मेंबर राजेश अगरवाल , सिनियर मेंबर दाऊद थासरावाला , अध्यक्ष अनिल गायकवाड , सेक्रेटरी अनंता पाडाळे , खजिनदार तस्नीम थासरावाला , हेमलता शर्मा , दिपाली डोंबले , रेखा पाडाळे , सुनिता गायकवाड , वैभव गदादे , अश्विनी पवार , मनोज जयस्वाल , शंख्येश्वरी रुग्णालयाच्या नर्स अर्चना इंगवले , वैशाली अंभोरे यांसमवेत उर्दू माध्यमिक विद्यालयाचे सईद नालमांडू सर , प्राथमिक विद्यालयाचे खान लतिफ सरदार सर, शिक्षक वर्ग व पालक, विध्यार्थी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.