if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):आदर्श शिक्षक सम्मान समिति व सुशिल कुमार शिंदे विचार मंच च्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरण समारंभ शनिवार रोजी इम्पेरियल गार्डन सोलापूर येथे पार पडला.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व शिक्षणतज्ज्ञ तथा शिक्षण सम्राट कर्नाटकातील बीदर येथील लोकप्रिय व्यक्तीमत्व डॉ. अब्दुल कदीर यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सईद अहमद युसूफ नलमांडू सर यांना “आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023” प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, शाहीन ग्रुपचे डॉ. अब्दुल कादीर,आमदार प्रणितीताई शिंदे,नगरसेवक रियाज हुंडेकरी,तौफिक हत्तुरे, फिरदोस पटेल,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी, शौकत पठाण, हाजी मैनोद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी केले.तर माजी नगरसेवक हाजी तौफिक हत्तूरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना बाबत सविस्तर माहिती दिली.व मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.सुशीलकुमार शिंदे यांनी ‘आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात शिक्षकांना संबोधित केले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून वेग- वेगळ्या शैक्षणिक संस्थेत आपली सेवा बजावत असलेल्या 151 शिक्षकांचा ‘आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सम्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे अ.कदीर म्हणाले की, आज जगात शिक्षणाला फार महत्व आहे चांगले शिक्षण घेतले तर आपण जीवनात चांगले यश प्राप्त करू शकतो. आपल्या पाल्यांच्या लग्नात खर्च कमी करा पण शिक्षणाला खर्च कमी पडू नये ज्यामुळे आपल्या पाल्यांचे भविष्य उज्वल होऊन तो एक यशस्वी उद्योजकात किंवा एक चांगल्या हुद्दयावर पोहचू शकतो. या वेळी हाजी मैनोददीन शेख यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोईज सिराज अहमद यांनी केले तर शौकत पठाण यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमात माजी नगरसेविका फिरदोस पटेल, श्रीमती हुंडेकरी, संयोजक समिती चे सदस्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.