लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी OBC आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली . यामध्ये लोणावळा नगरपरिषदेचा प्रभाग क्र . 1 ( इंदिरानगर ) , प्रभाग क्र . 2 ( तुंगार्ली ) व प्रभाग क्र . 3 ( भुशी रामनगर ) हे तीन प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत . यापैकी प्रभाग क्र . 1 प्रभाग क्र . 2 मधील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव झाल्या आहेत.
प्रभाग क्र . 13 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट राखीव झाली आहे . ओबीसी प्रभागांची आरक्षण सोडत आज सकाळी जाहिर झाली . यामध्ये शहरातील 27 सदस्य संख्येपैकी 4 जागा अनुसूचित जाती ( 2 महिला + 2 पुरुष ) व 1 जागा अनुसूचित जमातीसाठी ( महिला ) , 3 जागा ओबीसी साठी प्रवर्गासाठी असणार आहेत.
निवडणूक नियंत्रक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहिर केली.
लोणावळा नगरपरिषद आरक्षण सोडत व प्रभाग प्रभाग क्र.1 ( अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ( ब ) सर्वसाधारण . – प्रभाग क्र . 2 – ( अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ( ब ) सर्वसाधारण.
प्रभाग क्र . 3 – ( अ ) अनुसूचित जाती महिला व ( ब ) सर्वसाधारण
प्रभाग क्र . 4 – ( अ ) अनुसूचित जाती व ( ब ) सर्वसाधारण महिला . प्रभाग क्र . 5 – ( अ ) सर्वसाधारण महिला व ( ब ) सर्वसाधारण . प्रभाग क्र . 6 – ( अ ) सर्वसाधारण महिला व ( ब ) सर्वसाधारण . प्रभाग क्र . 7 – ( अ ) सर्वसाधारण महिला व ( ब ) सर्वसाधारण.प्रभाग क्र . 8 – ( अ ) अनुसूचित जाती महिला व ( ब ) सर्वसाधारण प्रभाग क्र . 9 – ( अ ) अनुसूचित जाती व ( ब ) सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र . 10 – ( अ ) सर्वसाधारण महिला व ( ब ) सर्वसाधारण . प्रभाग क्र . 11 – ( अ ) अनुसूचित जमाती महिला व ( ब ) सर्वसाधारण . प्रभाग क्र . 12 – ( अ ) सर्वसाधारण महिला व ( ब ) सर्वसाधारण.प्रभाग क्र . 13 – ( अ ) नागरिकांचा मागास – प्रवर्ग , ( ब ) सर्वसाधारण महिला व ( क ) सर्वसाधारण महिला.