![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक संपन्न झाली.एकूण 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकता सेवक विकास पॅनेल 7 जागांवर विजयी तर कामगार एकता सहकारी पॅनल 4 जागांवर विजयी झाला .
लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेचे 258 एकूण सभासद असून आज बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत 230 पैकी 222 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . यापैकी 19 मत बाद ठरवण्यात आली.लोणावळा नगरपरिषदेच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा क्र .1 येथे सकाळी 7:30 ते दुपारी 4:00 या वेळेत मतदान घेऊन लगेचच मतमोजणी करण्यात आली व निकाल जाहीर करण्यात आला.
एकता सेवक विकास पॅनेल च्या विरुद्ध कामगार एकता सहकारी पॅनल यांच्या दरम्यान चुरशीची लढत झाली . लढतीपूर्वीच एकता सेवक विकास पॅनेलचे जितेंद्र राऊत हे इतर मागास संवर्गातून , संतोष गिरी हे भटक्या विमुक्त जाती – जमाती ( एनटी ) संवर्गातून तर स्वाती गायकवाड आणि जयश्री रानवे या महिला गटातून असे एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते . त्यामुळे 15 पैकी उर्वरित 11 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात होते . यात एकता सेवक विकास पॅनेलचे 11 उमेदवार कप – बशी चिन्ह घेऊन रिंगणात उतरले होते तर त्यांच्या विरुद्ध कामगार एकता सहकारी पॅनलचे 7 उमेदवार ढाल – तलवार हे चिन्ह घेऊन लढत देत होते.
एकता सेवक विकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत : – बबन कांबळे , अनिल अकोलकर , सुभाष बलकवडे , खंडू बोभाटे , सूर्यकांत हाळंदे , मुरलीधर कांबळे.चेतन सारवान,
कामगार एकता सहकारी पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत :- सुनील दहिभाते , अंकुश खिल्लारे , अरुण मातेरे , अनंता टेमघरे, इत्यादी उमेदवार विजयी झाले.यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.