Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत विविध स्पर्धाचा बक्षीस...

लोणावळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत विविध संपर्धांचा बक्षिस समारंभ काल दि.17 रोजी सायंकाळी मॅपल गार्डन येथे संपन्न झाला.
लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 या मोहीमेच्या अनुषंगाने सिटीजन इंगेजमेंट या अंतर्गत जनजागृती करीता विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये चित्रकला, पोस्टर, जिंगल, शॉर्ट मुव्ही, वेस्ट टू बेस्ट, बेस्ट शाळा, बेस्ट हॉस्पीटल, निबंध, पथनाटय, स्वच्छ टेक्नोलॉजी चॅलेज इत्यादी विविध स्पर्धेमधील बक्षिसपात्र विदयार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक, नागरिक यांचा गौरव करण्याकरीता बक्षिस समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी पंडित पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड,मा. नगरसेविका शेजल परमार, सुवर्णा आकोलकर, संध्या खंडेलवाल,देविदास कडू, संजय घोणे, अरोही तळेगांवकर,विशाल पाडाळे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा उमा मेहता,उपमुख्यधिकारी डॉ. भगवान खाडे, बांधकाम विभागाच्या अभियंता वैशाली मठपती, पत्रकार विशाल विकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा विविध गटात प्रथम क्रमांक संध्या कलबंडी, अनुष्का आशिष बुटाला, वेदांत महेश जगताप, भारती राऊळ आदी. निबंध स्पर्धेत प्रथम नेहा गोकुळ पाटील, अनंत नामदेव भागवत,निबंध स्पर्धा खुला गट तृतीय क्रमांक शालिनी देवरे, प्लास्टिक पासून वस्तू बनविणे यात कुणाल हिरामण कांबळे, इको फ्रेंडली गणेश स्पर्धा यात खंडू बोभाटे,उत्कृष्ट स्वच्छता जिंगल स्पर्धा सलग तिसऱ्यांदा प्रदीप वाडेकर यांनी बाजी मारली तर उत्कृष्ट शॉर्ट स्वच्छता मूव्ही मध्ये रिधम स्टुडिओ प्रथमेश गुरव,स्वच्छता विषयक पथनाट्य स्पर्धेत ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल,स्वच्छ टेक्नॉलॉजी मध्ये स्मार्ट कॉमपोस्ट प्रथम तर बेस्ट गवर्मेट ऑफिस लोणावळा नगरपरिषद, बेस्ट स्कूल मध्ये ऑक्सीलियम कॉन्व्हेन्ट, बेस्ट हॉटेल ड्यूक्स, हॉस्पिटल मध्ये संजीवनी हॉस्पिटल,बेस्ट मार्केट म्हणून महात्मा ज्योतिबा फुले मार्केट,देविका सेल्फ हेल्प ग्रुप प्रथम तर हौसिंग सोसायटी मध्ये प्राईव्ह हील सैफ्ट रेसिडेन्सी, बेस्ट वॉर्ड मध्ये तुंगार्ली गावठाण चा प्रथम क्रमांक आला तर नेहा वाळूंज, पल्लवी शेट्टी, छाया माळी, साक्षी माळी, छाया वर्तक, उदय शेट्टी आदींना स्वच्छता चॅम्पियन चा पुरस्कार मिळाला.राघू भालेराव, संगीता वाल्हेकर, नगिना सोनवणे, निलेश पवार मुरलीधर कांबळे आदी ना बेस्ट एम्प्लॉयी म्हणून सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिक संघ यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्र संचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page