Saturday, November 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नवरात्र महोत्सव मंडळाचे 63 वर्ष पूर्ण, परिसरातील भाविकांनी घेतला माता च्या...

लोणावळा नवरात्र महोत्सव मंडळाचे 63 वर्ष पूर्ण, परिसरातील भाविकांनी घेतला माता च्या दर्शनाचा लाभ…

लोणावळा(प्रतिनिधी): लोणावळा नवरात्र महोत्सव मंडळ गवळीवाडा लोणावळा आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही होम हवन व धार्मिक गरबाचे आयोजन.
नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना 63 वर्षांपूर्वी झाली आहे. या मंडळाकडून दरवर्षी देवीची प्रतिष्ठापना करून, धार्मिक पद्धतीने गरबे केले जातात तर यामध्ये सर्व गुजराती समाजाच्या लोकांचा मोठा सहभाग असतो.
लोणावळा नवरात्र महोत्सव मंडळ, गवळीवाडा, लोणावळा हे लोणावळ्यातील सर्वात जुने मंडळ असून या मंडळात 63 वर्ष पूर्ण झाली आहे. येथे नवरात्र धार्मिक पद्धतीने साजरी केली जाते. दररोज आरती, भजन, स्तोत्रपठन आणि पारंपारिक पद्धतीने येथे गुजराती बांधव गरबा करत असतात या मंडळात सहभागी झाल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी यांचा रास गरबा नृत्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते.त्यांनी गायलेल्या भजनाचा आनंद वेगळाच असतो. गेली अनेक पन्नास वर्ष कल्याणजी यांच्या बंगल्यांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाच्या सभासद सहभागातून उत्सव पार पडत आहे. यावर्षीचे अध्यक्ष आशिष पाऊन यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा नवरात्र उत्सव आनंदाने साजरा केला जात आहे.
लोणावळ्यातील सर्वात जुने नवरात्र उत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणाऱ्या मंडळाच्या माताचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने याठिकाणी माताचे दर्शन घेण्यासाठी येत असून हे नवरात्र महोत्सव मंडळ सर्वत्र नावाजलेले आहे.
यंदा आठव्या माळेच्या दिवशी सायंकाळी माताचे होम हवन पूजा अर्चा करण्यात आली. यावर्षीचे मंडळाचे अध्यक्ष आशिष पाऊन, सभासद धीरूभाई कल्याणजी, जितुभाई कल्याणजी सह इतर सभासदांच्या उपस्थितीत परिसरातील अनेक राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते मंडळी यांनी उपस्थित राहून माता च्या दर्शनाचा लाभ घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page