लोणावळा : लोणावळा उपविभागीय क्षेत्रातील गावांमधील 102 पोलीस पाटलांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर लोणावळ्यात नुकतेच संपन्न झाले.
यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक दयानंद ढोमे यांनी या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित असलेल्या पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले .पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील एक सर्वात महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात ग्रामस्थांना पोलिस खात्याकडून आवश्यक असलेले दाखले कसे उपलब्ध करून द्यावेत , एखाद्या घटनेची खबर पोलिसांना कशी द्यावी , पंचनामा कसा असतो , अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कसे काम करावं त्याचप्रमाणे पोलीस पाटलांची काय काय कर्तव्ये आहेत आणि ती कशी पार पाडावी यासंदर्भातील मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल आणि कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांसमवेत सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.