if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : ( श्रावणी कामत )30 जुलै 2024: गोपनीय माहितीनुसार, लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगरगाव येथे पोलीसांनी मोठी कारवाई केली. श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या छाप्यात तीन आरोपींना अटक करण्यात आले. आरोपींची नावे शाहरुख असलम शेख, नितीन भरत कालेकर, आणि साजीद अकबर शेख अशी आहेत. हे तिघे केटीएम ड्यूक दुचाकीवरून एम.डी पावडर विक्रीसाठी नेत असताना पकडले.
पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून 7.1 ग्रॅम एम.डी पावडर आणि सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे यांच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी एस ॲक्ट 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत.
संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या या कारवाईमध्ये एम.डी पावडर आणि एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो. कॉ अमोल ननवरे, पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ गणेश ठाकुर, पो.कॉ प्रतीक काळे यांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरातील अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त होईपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील.