Wednesday, December 4, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन..

लोणावळा: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी: श्रावणी कामत
लोणावळा : आज दि. 3 मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी मुंबई येथे करण्यात आली होती. गेल्या 11 वर्षांपासून परिषदेच्या वतीने हा दिवस ‘पत्रकार आरोग्य तपासणी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.
याच परंपरेतून आज लोणावळ्यातील यश हॉस्पिटल येथे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी डॉ. हेमंत अगरवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट संजय पाटील होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पडाळे, मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणी कामत, जिल्हा संघटक रेखा भेगडे, अंबर पेपरचे प्रशांत पुराणिक, मावळ वार्ताचे प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने, धनु रोकडे , मंगेश कांबळे, योगेश चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार हे समाजाचे आरसे मानले जातात, परंतु त्यांच्या कामाचा ताण, अस्थिर वेळापत्रक, आणि सततच्या धावपळीमुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यांना अनेकदा प्रेम, आदर आणि जबाबदारीचा अनुभव मिळतो, परंतु त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना कधी कधी धोका आणि टीकेलाही सामोरे जावे लागते. अशा कार्यक्रमांमुळे पत्रकारांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन त्यांना हवी ती मदत मिळते.
कार्यक्रमाने पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page