if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(अष्ट दिशा मावळ प्रतिनिधी) दि. 30 रोजी, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो. हवा. जयराज जयसिंगराव पाटणकर ( 882) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील सिनेब्लिस निलकमल थिएटरच्या बाजूला एका खोलीत सुरु असलेल्या बेकायदेशीर कल्याण मटका धंद्यावर लोणावळा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
सदर कारवाईत मटका धंद्याचे मालक मुसा पठाण व कादर इनामदार समवेत धंद्यावर काम करणाऱ्या गणेश विश्वनाथ सिनकर ( वय 29, रा. देवघर, मावळ ), रवी चमनलाल सेहगल ( वय 59, रा. हनुमान टेकडी, लोणावळा ), अदिल बाबुलाल मुजावर ( 33, रा. इंद्रायणी नगर, लोणावळा ), पप्पू गणपत पवार ( वय 32, रा. हनुमान टेकडी, लोणावळा ), सुरेश दत्तू मानकर ( वय 59, रा. कुणेगाव, लोणावळा ), सुनील बाबू कदम ( वय 49, हनुमान टेकडी, लोणावळा ), प्रकाश नारायण डोंगरे ( वय 51, रा. देवले, मावळ ), व रमेश श्री लोणकर ( वय 38, रा. हनुमान टेकडी, लोणावळा ) इत्यादींवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनला मा झी मुंबई जुगार कायदा कलम 12( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई तेथील कामगारांकडून 46, 480 रु. चा मुद्देमाल व जुगारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, उपनिरीक्षक एम. एस. गायकवाड, जी. बी. होले चा. पो. ना. (137), व उपविभागीय कार्यालय लोणावळाचे पो. कॉ. एस. एम. वाडेकर ( 1507), एस. डी. शिंदे पो. कॉ. ( 90), एस. एस. डोईफोडे पो. कॉ. (3059) तर लोणावळा ग्रामीणचे व्ही. एच. शिंदे पो. कॉ. ( 1193) इत्यादींनी कामगिरी पार पाडली.