![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासाच्या आत उघडीस आणून आरोपीला बेड्या ठोकून धडाकेबाज कारवाई केली आहे.याप्रकरणी प्रियांशु उर्फ किटू प्रेम उठवाल (रा. सिद्धार्थ नगर, लोणावळा ) असे अटक आरोपीचे नाव आहे.अज्ञात आरोपी विरोधात दि.4 ऑक्टोबर रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये घरफोडी चोरी संदर्भातील गु र क्र146/2022 भा.द.वी. कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने फक्त 12 तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. 04/10/2022 रोजी रात्री 12:30 च्या सुमारास गावठाण हद्दीतील प्रियदर्शनी हॉलच्या शेजारील राहत्या घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलुप तोडुन घरातील वी वो कंपणीचा मोबाईल चोरी करून चोरुन नेला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.वगैरे मजकुरावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोस्टे हददीत कार्ला येथे एकवीरा देवीच्या दसरा निमीत्त मोठ्या प्रमाणावर भावीकांची गर्दी असल्यामुळे सदर ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी होवू नये यासाठी पेट्रोलींग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमी दारामार्फत बातमी मिळाली कि, रेकॉर्डवरील गुन्हेगार किटू उठवाल हा गर्दीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे . तसेच त्याच्याकडे मोबाईल असून तो एक हजार रुपयास विक्री करत आहे ते मोबाईल चोरीचे असण्याची दाट शक्यता आहे अशी बातमी मिळाल्याने सदरच्या इसमास सापळा रचून त्यास पकडून विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने लोणावळा शहरात रात्री घरफोडी चोरी करून चोरले असल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेतल्याने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावीक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीस आळा बसला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि.अशोक शेळके यांच्या आदेशानुसार लोणावळा विभागात लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेख तपासले असता सदर बाबत लोणावळा शहर पोस्टे गुरनं 146/2022 भा.द.वी.क. 457,380 प्रमाणे गुन्हादाखल असल्याबाबत निष्पन्न झाले आहे.
सदरच्या आरोपीने त्याचे नाव प्रियांशु उर्फ किटु प्रेम उठवाल (रा.सिद्धार्थ नगर लोणावळा ता. मावळ जिल्हा पुणे) असे सांगितले आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकामी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोसई प्रदीप चौधरी,सहा.फौजदार प्रकाश वाघमारे,पो.ह. वैभव सुरवसे,पोकॉ निलेश सुपेकर,पो.कॉ.प्राण येवले,पो.कॉ अजिज मिस्त्री यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.