लोणावळा(प्रतिनिधी): लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने शहरात फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
लोणावळा काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, जेष्ठ नेते, युवक व महिला आणि पदाधिकारी सर्वांच्या संकल्पनेतून तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवीन संकल्पना दरवर्षी राबविण्यात येत आहे. यावर्षीही सर्वांसोबत दिवाळी साजरी करताना सर्वांची दिवाळी गोड व्हावी या संकल्पनेतून दिवाळी फराळाचे वाटप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले.तसेच यावेळी बहुसंख्य नागरिकांनी फराळ वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून फराळाचा अस्वाद घेतला.
सदर कार्यक्रमास काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, नासीर शेख, जितेंद्र कल्याणजी, बाबुभाई शेख, उषाताई चौधरी, राजू गवळी, सुधीर शिर्के यांसमवेत काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.