लोणावळा (प्रतिनिधी):लायन्स क्लब ऑफ लोणावळा ,लायन्स क्लब ऑफ डायमंड,लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स ,लायन्स क्लब ऑफ लोणावळा – खंडाळा, लायन्स क्लब ऑफ ओतूर अशा लोणावळ्यातील 4 आणि ओतूर येथील 5 क्लबद्वारे आयोजित केलेल्या मधुमेहविरोधी मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक,आर्मी नेव्ही, पोलिस कॅडेट, विध्यार्थी,व नागरिक इत्यादी अशा सरासरी 700 स्पर्धकांनी विविध श्रेणींमध्ये सहभाग घेतला.
सर्व श्रेणींसाठी बक्षिस, प्रमाणपत्र, टी-शर्ट ,पाण्याचीबाटली ,सफरचंद, केळी याचे नियोजन आयोजकांकडून विविध ठिकाणी करण्यात आले.
सदर मधुमेहविरोधी मॅरेथॉन स्पर्धेसाठी डीजी सर,सीईओ शामजी खंडेलवाल, सी.एस.अशोक सर,मिस्त्री आदींनी विशेष सहकार्य केले. लोणावळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लोकांचा साक्षीदार असणारी मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून. मॅरेथॉन, प्लग कार्ड आदींद्वारे मधुमेह जनजागृती संदेशासोबत.शहरात प्रतिमा उभारणीचा मोठा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.