लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर हद्दीतील वलवण गावातील राहत्या घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार 17 ऑक्टोबर11:45 ते 18 रोजी पहाटे 4 च्या सुमारास घडला आहे.
याबाबत योगेश विलास दुबे (वय 29, रा. वलवण, लोणावळा, व्यवसाय इलेक्ट्रिशन ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे.
यानुसार लो.श.पो.स्टे.गु. रजि. नं. 158/2022 भा.द.वि. का. कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी योगेश दुबे यांच्या वलवण येथील राहत्या घराच्या पार्किंग मधून 17 ऑक्टोबर च्या पहाटे दुचाकी क्र. एम एच 14 डी के 5158 ही हिरो स्प्लेंडर दुचाकी अंदाजे 15,000 हजार रु. किंमतीची अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे.वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करून गुन्ह्याचा प्रथम वर्दि रिपोर्ट मा. हुजुर कोर्ट यांना रवाना करून पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या आदेशानुसार पुढिल तपास पो हवा मडके हे करत आहेत.
लोणावळा शहर परिसरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.शनिवार दि.15 रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान नांगरगाव येथून इको कार क्र . एम एच 14 जि एच 9749 चोरी झाली याप्रकरणी नितिन वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली तर सोमवार दि .17 रात्री ते मंगळवारी पहाटे दरम्यान वलवण गावातून हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्र .एम एच 14 डी के 5158 चोरीला गेली याप्रकरणी योगेश दुबे यांनी फिर्याद दिली आहे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून रात्री गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.