लोणावळा दि.6: भारतरत्न क्रांतिसूर्य परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र शिल्पास पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनसे चे शहराध्यक्ष भारत चिकणे, मावळ तालुका उपाध्यक्ष रमेश म्हाळसकर,लोणावळा शहर उपाध्यक्ष राहुल देसाई, उपाध्यक्ष रितेश भोमे,उपाध्यक्ष दिनेश कालेकर, निखिल भोसले, मनसे वाहतूक सेना कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अमित भोसले, अभिजित भासगे,अजिंक्य बोभाटे, रामेश्वर मंगवडे, शबाबा नांगर यांसमवेत मनसे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.