लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणावळा शहरातील जयचंद चौक या ठिकाणी 7 सप्टेंबर रोजी भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते या दहीहंडीचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच ही दहीहंडी इस्रो च्या सर्व वैज्ञानिकांना समर्पित करण्यात येणार असून यावेळी तीन अभिनेत्री आणि दोन अभिनेते या दहीहंडीचे आकर्षण ठरणार आहेत.
यंदा दहिहंडीसाठी 9,99,999/- रुपयांची सामुहिक बक्षिसे ठेवण्यात आली असून पाच थरांची सलामी देणाऱ्या प्रत्येक स्थानिक व मुंबई पुणे च्या संघाला 5 हजार रुपयांचे बक्षिस आणि सर्वात वरिल थरावर असलेल्या प्रत्येक बाल गोविंदाला सन्मानचिन्ह,रोख रक्कम व मेडल देण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस मंजुश्री वाघ, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष विनोद होगले, प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे,चित्रपट सेलचे अध्यक्ष संतोष कचरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.