Thursday, June 19, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर व ग्रामीण विभागाच्या पोलिस नेतृत्वात बदल..

लोणावळा शहर व ग्रामीण विभागाच्या पोलिस नेतृत्वात बदल..

किशोर धुमाळ, सुहास जगताप यांची पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षात बदली; राजेश रामाघरे आणि दिनेश तायडे यांच्यावर लोणावळ्याची जबाबदारी.

लोणावळा | प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार लोणावळा शहर व ग्रामीण विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे लोणावळ्यात पोलिस प्रशासनात नवीन चेहऱ्यांची नियुक्ती होत असून, अनुभवी अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्यांची संधी मिळाली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची बदली पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सखाराम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुहास जगताप यांचीही बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांची बदली करून नियुक्ती करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुहास जगताप आणि किशोर धुमाळ या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर लवकरच पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी लोणावळा शहर व ग्रामीण भागात कार्यरत असताना गुणात्मक तपास, गुन्हेगारांवर वचक, आणि सामाजिक उपक्रमांद्वारे जनसंपर्क या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page