Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेडमध्ये सामंजस्य करार..

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेडमध्ये सामंजस्य करार..

लोणावळा : दि .26 सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा आणि ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेड, लोणावळा यांच्या दरम्यान उद्योग-शिक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या हेतूने 26 ऑगस्ट 2024 रोजी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण उद्योगाच्या गरजांशी अधिक सुसंगत होण्यास मदत होईल आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल.
या करारावर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख श्री. एस. डी. दाते, आणि आरअँडडी समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेडकडून जनरल मॅनेजर श्री. प्रमोद चव्हाण, आरअँडडी मॅनेजर श्री. चिंतामणी जानकोळी, आणि सहाय्यक मॅनेजर आरअँडडी श्री. अतुल जाम्बरे उपस्थित होते.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून अभ्यासक्रम रचना, औद्योगिक भेटी, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि प्लेसमेंट संधी, संशोधन आणि विकास, अतिथी व्याख्याने, तसेच शिक्षक विकास कार्यक्रम या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. दोन्ही संस्था विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित शिक्षणात अधिक गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या करिअर संधींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील.
या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळण्याबरोबरच शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या नव्या प्रगतिसंबंधी माहिती मिळवण्याची संधी मिळेल. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि दोन्ही संस्थांच्या एकूण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page