Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील डॉ.सुनील जाधव यांचा जपानमध्ये सत्कार…

लोणावळ्यातील डॉ.सुनील जाधव यांचा जपानमध्ये सत्कार…

लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळ्यातील सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ.सुनील जाधव यांचा जपानमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. आपल्या शहरातील अथवा मावळातील डॉक्टरचा परदेशात होणारा सत्कार खरोखरच अभीमानास्पद आहे.
जागतिक बौद्ध मिशन, जपान आणि अमेरिका मध्‍ये ओकायामा प्रीफेक्‍चर हॉल (ओकायामा सिटी) येथे बौद्ध धर्मावर दि.7 – 9 जुलै दरम्यान परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेमध्ये डॉ सुनील जाधव यांना आमंत्रित करण्यात आले.
आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जपानमधील योकोहामा शहरातील सेंट्रल लायब्ररी हॉलमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सुनील जाधव यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना आपल्या व्याख्यानात भारतीय बुद्धिसम मांडला. यावेळी जपान योकोहामा मधील भंतेजी रवी मेधनकर,भंतेजी विशुदानंद यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीं उपस्थिती होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page