Thursday, June 19, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील भुशी डॅम आज सकाळपासून फुल ; पर्यटकांनी घेतली पहिली झलक...

लोणावळ्यातील भुशी डॅम आज सकाळपासून फुल ; पर्यटकांनी घेतली पहिली झलक…

भुशी डॅम वॉटरफॉल पर्यटकांसाठी खुला; पावसामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य..

लोणावळा : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो होऊ लागला असून, त्यामुळे धबधब्यासारखा नजारा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे डॅम भरू लागला असून पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं पुन्हा भुशीकडे वळू लागली आहेत.

शनिवारीपासून सुरु झालेल्या पावसामुळे डॅमच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले असून धबधब्याच्या रूपात हे दृश्य अतिशय आकर्षक दिसत आहे. डोंगर-दऱ्यांमध्ये पसरलेले हिरवे गालिचे, थंडगार वारे, धुके आणि वाहणारे पाणी यामुळे भुशी परिसराने पुन्हा एकदा निसर्गप्रेमींना भुरळ घालायला सुरुवात केली आहे.

पर्यटनास प्रारंभ, पण दक्षतेची गरज:
पर्यटकांसाठी हा हंगाम सुरू झाला असला, तरी डॅम परिसरात पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डॅमच्या पायऱ्यांवर न जाता सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे.

भुशी डॅम परिसरात दुकानांची लगबग:
डॅम परिसरातील स्थानिक दुकानदारांनी देखील आपल्या दुकानांची तयारी केली असून गरमागरम भजी, चहा आणि कॉर्नसारख्या खाद्यपदार्थांची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे लोणावळ्याला आलेल्या पर्यटकांसाठी भुशी डॅम हा एक आवडता पर्याय ठरू लागला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page