लोणावळा(प्रतिनिधी): लोणावळ्यातील मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका रेश्मा शेख यांचा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा सोमवार दि.17 रोजी पुणे येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी मेळाव्यात संघटनेचे पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा समन्वयक व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
रेश्मा शेख यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान आहे. यांनी खडतर परिस्थितीचा सामना करून महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कार्याचे कौतुक करत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.