Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील सहारा ब्रिज व मॅगी पॉईंट कायमस्वरूपी होणार बंद…

लोणावळ्यातील सहारा ब्रिज व मॅगी पॉईंट कायमस्वरूपी होणार बंद…

लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा शहरात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मॅगी पॉइंटवर सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्व टपऱ्या हटविण्याबाबत पोलिसांकडून पावले उचलली जात आहेत.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी (IPS) सत्यसाई कार्तिक यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि लोणावळा नगरपरिषदेला पत्र पाठवून कारवाई करण्याबाबत सुचवले आहे.
लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ आहे. शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक, अती महत्वाचे व्यक्ती आणि देश विदेशातील नागरिक लोणावळा शहर परिसरात येत असतात.
मॅगी पॉईंट वरील अनधिकृत टपऱ्या पूर्णपणे बंद होण्यासाठी लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिकी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि लोणावळा नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे.
लोणावळा शहराजवळ सहारा ब्रिजवर व मॅगी पॉइंट येथे काही नागरिकांनी अनधिकृतपणे खाद्य पदार्थांच्या टपऱ्या लावल्या आहेत. या टपऱ्यांवरून आर्थिक वर्चस्वासाठी वारंवार वाद होतात.मॅगी पॉइंटवर झालेल्या हाणामारीच्या घटनांप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
तसेच लोणावळा येथून मुंबई बाजूकडे जाणारा रस्ता उताराचा असून त्याच ठिकाणी हा मॅगी पॉइंट असल्यामुळे या ठिकाणी वाहने वेगात जात असतात. काहीजण रस्त्यावर चहापाण्यासाठी थांबले असताना इथे अपघात झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page