लोणावळा : आपत्ती व्यवस्थापन काळात मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी पारित केलेल्या निर्देशाप्रमाणे मावळातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटनास बंद केली आहेत, तरीही काही पर्यटक जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाचे उल्लंघन करून पोलिसांची नजर चुकवून छुप्या मार्गाने शहरात प्रवेश करत वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत. दि. 08 रोजी मुळशी तालुक्यातील चौघेजण लोणावळा येथे वर्षाविहारासाठी आले होते. त्यांनी आपल्या जवळील रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. त्या प्रकरणी चौघांविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत पो. कॉ. माणिक विलास अहिनवे ( वय 27, ब. नं. 1339) लोणावळा शहर पो. स्टेशन यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी1) सागर मोहन भुमकर ( वय 35 वर्ष, रा. भुमकर वस्ती, वाकड, ता. मुळशी, जि. पुणे )2) संदीप हनुमंत जाधव ( वय 36 वर्ष, रा. नऱ्हे, ता. मुळशी, जि. पुणे )3) सचिन बाळासाहेब भुमकर ( वय 35 वर्ष, रा. भुमकर वस्ती, वाकड, ता. मुळशी, जि. पुणे )4) सचिन साहेबराव मांदळे ( वय 38 वर्ष, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे ) हे चौघे शहरातील पर्यटन स्थळे पर्यटनास बंद असताना.
लोणावळा शहरात वर्षाविहारासाठी आले. आणि सायंकाळी 06: 45 वा. सुमारास लोणावळ्यातील भुशी डॅम रोडवरील सहारा ब्रिज या सार्वजनिक ठिकाणी आपल्या जवळ असलेले 32 बोअर रिव्हॉल्वर मधील सहा काडतुसांपैकी एक गोळीचा हवेत गोळीबार केला तसेच आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केल्या प्रकरणी ह्या चौघांविरोधात भा. द. वि. कलम 188/269/336 शस्त्र अधिनियम कलम 30 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/112/117 प्रमाणे गुन्हे दाखल करुण त्यांच्याकडील 05 जिवंत व 01 फायर झालेले काडतूस आणि एक कानपुर बनावटीची 32 बोअर रिव्हॉल्वर असा अंदाजे 80, 000=00 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या घटनेतील पुढील तपास पो. स. ई. सांगळे लो. श. पो. स्टेशन हे करत आहेत.