if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा: क्रांतिनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी शाहिदास विठ्ठल काळे (वय 27 वर्षे, रा. क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करून जेलमध्ये रवानगी केली आहे.
पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नुसार, 6 जुलै रोजी रात्री 8 वाजता, आरोपीने पीडित 15 वर्षीय मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी बी.एन.एस. 65 (1), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4, 8, 12 आणि अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम 3(1)(डब्लू)(आय), 3(2)(व्ही), 3(2)(व्हीए) या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक करत आहेत.
ही घटना बालकांचे संरक्षण आणि मानवाधिकारांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. भारतीय कायद्याने अशा घटनांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे, परंतु समाजात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने सतर्क राहून आपली भूमिका बजावणे गरजेचे आहे.