लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा सोनार गल्ली परिसरात 45 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सोनार गल्ली येथील राकेश जैन यांच्या घरामागे अज्ञात मृतदेह मिळून आला त्यास रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.या मृत देहाजवळ ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने सदर व्यक्ती बद्दल काही माहिती असल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.- अंगामध्ये पांढऱ्या काळ्या रेषा असलेला पूर्ण बाह्याचा शर्ट, राखाडी रंगाची नाईट पॅन्ट, डोक्यावर काळे पांढरे केस दाढी वाढलेली वय अंदाजे 45 ते 50 वर्ष. सदर व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक सुधीर डुंबरे करत आहेत.