लोणावळा: ( प्रतिनिधी ) रोटरी क्लब व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगरपरिषद सभागृह येथे आशा भगिनीं सोबत रक्षाबंधनाच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोविड काळात अतिशय जोखमीचे काम केलेल्या आशा सेविकांनी दोन्ही क्लबच्या रोटेरिंस् ला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.यावेळी सर्व भगिनींचा साडी व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या नंदाबेन आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांकडून रक्षाबंधनाचे अध्यात्मिक महत्व विशद करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ लोनावळाचे अध्यक्ष आशिष मेहता व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष संजय कागदे यांनी असून सुत्रसंचालन पुंडलिक वानखेडे तर आभार प्रदर्शन रविंद्र कुलकर्णी यांनी केले.
यावेळी लोणावळा रोटरी क्लबचे जयवंत नलोदे,उदय पाटील, नितीन कल्याण,मुश्तफा कॉन्ट्रॅक्टर, नारायण शेरवले ,फस्ट लेडी रो.श्वेता मेहता तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे राजेश कदम, निलेश गोखले,मनोज क्षिरसागर,सुदिप साळवी, जगदिश तांबट व राजेश देशमुख आणि आशा सेविका यांच्या उपस्थित हा अनोखा कार्यक्रम आनंदात पार पडला.
राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.