Thursday, January 30, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात दूषित पाणीप्रश्नी जीबीएस आजार टाळण्यासाठी भाजपची मागणी..

लोणावळ्यात दूषित पाणीप्रश्नी जीबीएस आजार टाळण्यासाठी भाजपची मागणी..

लोणावळा: दूषित पाण्यामुळे होणारा गंभीर जीबीएस (गिलियन बरे सिंड्रोम) आजार लोणावळा शहरात होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. भाजपच्या लोणावळा शहर शाखेच्या वतीने उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
जीबीएस हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार गंभीर स्वरूपाचा असून, वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर त्याचा परिणाम शहरातील आरोग्यावर होऊ शकतो, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी भाजप शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगरसेवक देविदास कडू, माजी युवा अध्यक्ष शशिकांत मानकर, शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल काकडे, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल होगले, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, तसेच भाजपचे पदाधिकारी वैभव देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांनी दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, संबंधित विभागांना यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
भाजपने लोणावळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page