लोणावळा : ओक्झिलीयम कॉन्व्हेंट स्कूल आणि इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड यांच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या सिस्टर शोभा, अलसमा टीचर, ममता टीचर, तसेच गिल्डच्या अध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, खजिनदार सुरेश गायकवाड, राजश्री कांबळे, आशिष जांगीर, दिक्षा कांबळे, अंबिका गायकवाड आणि महाराष्ट्र PRO श्रावणी कामत उपस्थित होते.
कार्यक्रमात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामघरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूळकर, पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तत्पर असतात, आणि याच भावनेने शाळेतील लहान मुलींनी पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर पोलीसही मुलांसोबत एक मित्र, एक भाऊ म्हणून मनमोकळेपणाने मिसळले.
या उपक्रमातून पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील आपुलकी, विश्वास आणि बंधुत्वाचे नाते अधिक घट्ट झाले.