if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : वलवण गावातील मस्जिद ही ट्रस्ट खाजगी मालमत्ता असून काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुस्लिम बांधवांची दिशाभूल करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी याचा वापर करत हडप करण्याच्या उद्देशाने कट रचल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. सदरबाबत फिर्यादी खुर्शीद मोहम्मद इब्राहिम शेख ( वय.58, रा. फ्लॅट नं. 6, आघाडी नगर, एम. एन. ओ. सोसायटी, यारी रोड, वर्सोवा मुंबई 59) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी खुर्शीद शेख यांचे आजोबा शेख हाजी अहमद इस्माईल व आज्जी साबीराबी शेख यांनी मिळून कै. शेख हुसेन शेखतानाजी यांच्या कडून वलवण लोणावळा येथील सर्वे नं. 64, ही जमीन खरेदी केलेली होती. त्यानंतर त्यांनी सर्वे नं. 60, 61, 62, 63 ह्या जागा देखील खरेदी केलेल्या होत्या. कै. शेख अश्रफ मोहम्मद बक्ष व शेख हाजी अहमद इस्माईल, साबीरबी शेख यांना लोणावळा शहरामध्ये मुस्लिम धर्माचे कार्य करण्याचे ठरवून त्यांनी त्यांच्या मालकीची खरेदी केलेली मिळकत सर्वे नं. 64 मध्ये रीतसर परवानग्या घेऊन याठिकाणी मस्जिदचे बांधकाम करून धार्मिक कार्य सुरु करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांनी मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट नुसार मुंबई येथील चॅरिटी कमिशनर यांच्या कार्यालयामध्ये ” वलवण मस्जिद ” नावाने ट्रस्टची नोंदणी केली. तसेच सर्वे नं. 60, 61, 62, 63 मध्ये सुद्धा सामाजिक कार्याच्या उद्देशाने “शेख हाजी अहमद इस्माईल तंबाखुवाला ट्रस्ट ” या नावाने कौटुंबिक ट्रस्टची स्थापना केली.आणि त्याठिकाणी मदरसा स्थापन करून तिथे मदरशाचे कार्य सुरु केले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रस्टच्या नावाने बँक खाते उघडून सर्व व्यवहार सुरु केले होते.
सन 2014 साली सदर ट्रस्ट वक्फ बोर्डकडे देण्यात आली असून वलवण गावातील मुस्लिम समाज ट्रस्टच्या ” मस्जिद ” मध्ये नमाज आदा करण्यासाठी व इतर धार्मिक कार्यासाठी येत होते. सदर ट्रस्टमध्ये स्थानिक लोकांचा कोणताही संबंध नसताना आरोपी शब्बीर अब्दुल रहेमान शेख, जाबीरअली अहमदअली सैय्यद, अन्वर नुरमोहम्मद शेख, अमजदखान कासमखान, सलीम खान पि हसन खान, हाजी हिफजूर रहेमान अब्दुल रहेमान, हाजी अहमद इस्माईल शेख, हाजी हुसेन अहमदअली शेख ह्यांनी संगणमताने कट रचून “वलवण मस्जिद ” ट्रस्टच्या नावाने बनावट लेटर हेड छापून, बनावट लेटर हेडवर स्वतःच्या स्वाक्षऱ्या करून अनेक शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर करून आरोपी शब्बीर शेख याने त्यास कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीर रित्या बनावट ठराव करून वलवण मस्जिद च्या नावाने लोणावळा येथील मुस्लिम को ऑप बँक मध्ये बचतखाते उघडून आरोपींनी खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारे ” वक्फ इंस्टयुटूशन वलवण मस्जिद ” या नावाने पॅन कार्ड तयार करून ट्रस्टच्या मिळकती हडप करण्याच्या उद्देशाने बनावट ठराव व बनावट लेटर हेडचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुस्लिम नागरिकांची दिशाभूल करत देणग्या स्वीकारून आर्थिक अफरातफर करून ट्रस्टच्या विश्वस्तांची फसवणूक केलेली आहे.
त्यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समिंदर करे यांनी सदर आरोपींच्या विरोधात गुन्हा र. नं. 456/2020भा. द. वि. कलम 420, 467, 468, 471, 465, 120 (ब ), 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करून घेतली असून , गुन्ह्याचा अहवाल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो वडगाव मावळ यांना रवाना करून पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक सांगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.