Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात महाविकास आघाडीचा बदलापूर घटनेविरोधात मुक निषेध..

लोणावळ्यात महाविकास आघाडीचा बदलापूर घटनेविरोधात मुक निषेध..

लोणावळा: महाविकास आघाडीच्या वतीने आज, २४ ऑगस्ट रोजी लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदलापूर येथील घटनेचा विरोध म्हणून मुक निषेध करण्यात आला. यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून, पावसातही निषेध नोंदवला. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, परंतु न्यायालयाच्या सूचनांचा आदर राखत बंद मागे घेतला व फक्त शांततामय मोर्चे व निषेध आंदोलनाचे आवाहन करण्यात आले.
निषेध नोंदवण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रमोद गायकवाड, नासीर शेख, बाळासाहेब फाटक, मच्छिंद्र खराडे, निखिल कवीश्वर, बाळासाहेब पायगुडे, शादान चौधरी, आशिष ठोंबरे, राजू बोराटी, मारुती खोले, सुधीर शिर्के, विनोद होगले, श्वेता वर्तक, फिरोज शेख, अय्याज शिकिलकर, सुधीर कदम यांसारखे महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन देत असताना काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांच्या स्थानिक आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनीही आपला विरोध व्यक्त केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page