Friday, November 22, 2024
Homeक्राईमलोणावळ्यात लुटणे व चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, पोलिसांकडून कारवाई होणे गरजेचे…

लोणावळ्यात लुटणे व चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, पोलिसांकडून कारवाई होणे गरजेचे…

लोणावळा (प्रतिनिधी): नांगरगाव आयटीआय (ITI) रोडवर एका नागरिकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना काल दि.9 रोजी सायंकाळी 6 ते 7 वा.च्या दरम्यान घडली.याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार,काल सायंकाळी एका नागरिकाला तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झाले आहेत.
नांगरगाव ते डोंगरगाव या भागात जाणारा रस्ता हा कमी वर्दळीचा आहे. या ठिकाणी सदरचा प्रकार घडला आहे. पोलीस प्रशासनाने या लूटमार करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये लोणावळा शहरात विविध भागांमध्ये नागरिकांना लुटण्याचे व चोरीचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेक नागरिक हे पहाटे व रात्री जेवण झाल्यानंतर देखील या रोडवर वॉकसाठी जात असतात, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.मात्र अद्याप एकही गुन्हा उघडकीस न आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. लोणावळा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला या चोरट्यांच्या शोध घेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page