लोणावळा : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रमेशभाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांनी माता रमाई यांच्या कार्याचा गौरव करत अभिवादन केले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रवीणजी साळवे, माजी नगराध्यक्ष आर. डी. जाधव, बबनराव ओव्हाळ, अमितजी ओव्हाळ, बाबा ओव्हाळ, जे. के. गरड, नितीन वाघमारे, सुरेश दुबे, नामदेव राठोड, अजय सरोदे, रामकिशोर गुप्ता, दत्ता बंडकर, दत्ता देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी विविध वक्त्यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकत समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अंकुश चव्हाण व राहुल गायकवाड यांनी केले.