Saturday, June 21, 2025
Homeपुणेलोणावळ्यात २१ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमालेची सुरुवातसात दिवस, सात विषय… रसिकांसाठी वैचारिक मेजवानी..

लोणावळ्यात २१ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमालेची सुरुवातसात दिवस, सात विषय… रसिकांसाठी वैचारिक मेजवानी..

प्रतिनिधी : श्रावणी कामतलोणावळा – विविध विषयांवरील मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी घेऊन येणारी वसंत व्याख्यानमाला यंदा २१ एप्रिलपासून लोणावळ्यात सुरू होत आहे. स्व. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेने २००३ साली सुरू झालेली ही व्याख्यानमाला यावर्षी २३व्या वर्षात पदार्पण करत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील विचारवंत, साहित्यिक, कलाकार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे रसिकांशी संवाद साधणार आहेत. २१ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान सात दिवस रंगणाऱ्या या व्याख्यानमालेत दररोज विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे –
२१ एप्रिल: ‘मधुराणीचा जीवनपट’ या विषयावर सौ. मधुराणी गोखले प्रभुलकर यांची प्रकट मुलाखत, कु. अनघा मोडक यांच्या संवादातून
२२ एप्रिल: प्रा. मॅक्सवेल लोपीस (वसई) यांचे ‘संत मीराबाई’ या विषयावर व्याख्यान
२३ एप्रिल: डॉ. नितीन आरेकर यांचे ‘मला भेटलेली माणसे’ या विषयावर विचारमंथन
२४ एप्रिल: अभिनेता स्वप्निल राजशेखर यांचे ‘Total Filmy आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर व्याख्यान
२५ एप्रिल: ‘हिमालयाची साद’ – श्री. शरद कुलकर्णी, श्री. संभाजी राव गुरव, सौ. मेघा परमार आणि बाल गिर्यारोहक कु. अन्वी घाटगे यांच्यासोबत संवाद
२६ एप्रिल: ‘तेजस्वी स्वा. सावरकर – स्फूर्तीगाथा’ – श्री. सुधांशु नाईक, सौ. आश्लेषा महाजन, सौ. आरती परांजपे आणि श्री. प्रसाद नातू यांचा सहभाग
२७ एप्रिल: ‘गोष्ट एका राजहंसाची – संगीताचा अलौकिक प्रवास’ – संगीत मैफिल, कु. अनघा मोडक आणि ग्रुप
या व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी वसंत व्याख्यानमाला समिती सज्ज झाली असून, लोणावळ्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा सौ. राधिकाताई भोंडे यांनी केले आहे.
यावर्षीच्या कार्यकारिणीत सौ. स्वरूपा देशपांडे (अध्यक्ष), श्री. नितीन तिकोणे (उपाध्यक्ष), सौ. वैशाली साखरेकर (सचिव), श्री. संजय वाड (सहसचिव), सौ. चारूलता कमलवार (कोषाध्यक्षा), सौ. संयोगिता साबळे (सहकोषाध्यक्षा), श्री. प्रशांत पुराणिक (समन्वयक), श्री. आनंद गावडे आणि प्रसिद्धी प्रमुख सौ. श्रावणी कामत यांची निवड करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page