लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील मारुती ड्रायव्हिंग स्कूलच्या ऑफिस मध्ये गळफास घेऊन एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार भांगरवाडी येथे काल दि.23 रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आला आहे. सदर घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माली नोहा कृष्णमूर्ती (वय.18, रा. भांगरवाडी लोणावळा )असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एम. कृष्णमूर्ती (वय 50, व्यवसाय ड्रायव्हिंग स्कूल, रा. कन्या शाळेजवळ, सह्याद्री श्री अपार्टमेंट, भांगरवाडी, लोणावळा )यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजि.नं.55/2023 सी.आर.पी.सी.174 दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार खबर देणार यांनी खबर दिली की ता.23/07/2023 रोजी दुपारी 2.30 वा.चे सुमारास आम्ही सर्व कुटुंबीय नांगरगाव येथील चर्चमध्ये गेलो होतो व तेथून परत आलो.त्यानंतर आम्ही घरात थांबलो व नोहा हा दर रविवारी माझे ऑफिसमध्ये दुपारी आराम करीत असे त्याप्रमाणे तो ऑफिसमध्ये आराम करण्यासाठी गेला.त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजे पर्यंत मुलगा नोहा हा बाहेर आला नाही.म्हणून त्यास फोन केला परंतु त्याने फोन ही उचलला नाही.म्हणून ऑंफिसचा दरवाजा वाजविला असता दरवाजा आतुन बंद होता तर आम्ही ऑफिसचे पुढील शटर उघडले असता मुलगा नोहा याने ऑफिसचे दरवाजाला असणारे अँगलला दोरी बांधून गळफास घेतला होता.
आम्ही त्यास उतरवून तात्काळ संजिवनी हॉस्पिटल लोणावळा येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी 7:55 वाजता त्यास तपासून तो उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.वगैरे मजकुराचे खबरीवरुन मयत रजिस्टरी दाखल करुन मयताचा पुढिल तपास पो.नि.सिताराम डुबल यांच्या आदेशान्वये पो.हवा. म्हेत्रे हे करत आहेत.