Saturday, December 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात 2 लाख 96 हजाराचा अवैध दारू साठा जप्त,आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची...

लोणावळ्यात 2 लाख 96 हजाराचा अवैध दारू साठा जप्त,आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आईपीएस सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करीत एकूण 2 लाख 46 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी आईपीएस सत्यसाई कार्तीक यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराच्या मार्फत एक गुप्त बातमी मिळाली की एक पॅगो कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम.एच. 12 टी.यू. 1473) दारू वाहतुकीचा अथवा दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना पुण्यातून आपटी या गावाकडे अवैधरित्या दारू घेऊन चालला आहे.
या माहितीच्या आधारे आईपीएस सत्यसाई कार्तिक हे त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांच्यासह अपटी गावाच्या हद्दीमध्ये पुणे ते अपटी रोडवर दबा धरुन बसले. संशयित टेम्पो त्याठिकाणी येताच आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी तो पकडून त्याची झाडाझडती घेतली. या झडतीत टेम्पो मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू आढळून आली. या कारवाई मध्ये पोलिसांनी टेम्पो व त्यातील 96 हजार 660 रुपयांची दारू असा एकूण 2 लाख 46 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी तो पकडून त्याची झाडाझडती घेतली. या झडतीत टेम्पो मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू आढळून आली. या कारवाई मध्ये पोलिसांनी टेम्पो व त्यातील 96 हजार 660 रुपयांची दारू असा एकूण 2 लाख 46 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
वरील प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये आईपीएस सत्यसाई कार्तिक यांच्यासह सहा. पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पो. हवा. सिताराम बोकड, पो. ना. किशोर पवार, पो. शि. सुभाष शिंदे यांनी भाग घेतला होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page