लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषदेच्या सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे दिवाळी अंक योजना 2023 चा शुभारंभ दि. 8/11/2023 रोजी लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोणावळा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, पत्रकार विशाल विकारी,लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती सागर तावरे, शहर समन्वयक अक्षय पाटील, स.ग्रंथपाल विजय लोणकर, ग्रंथालयातील सर्व कर्मचारी, सभासद, नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मा.उपमुख्याधिकारी यांनी प्रतिनिधीक स्वरुपात श्री.भरत हिर्लेकर व सरस्वती कसबे, अंजली म्हसकर यांना ओळखपत्र व दिवाळी अंक वितरीत केले. दरवर्षीप्रमाणे ग्रंथालयाने सर्व प्रकारचे दिवाळी अंक सभासदांकरीता उपलब्ध करुन दिलेले आहे. लोणावळा नगरपरिषदेचे सानेगुरुजी ग्रंथालय संपूर्णपणे संगणकीकृत झालेले आहे.
यामध्ये ग्रंथालयाने अस्तित्वात असणा-या सर्व पुस्तकांना बारकोडींग करुन सर्व नोंदी संगणकीकृत केलेल्या आहेत. यामध्ये ग्रंथालयातील सर्व सभासदांना बारकोडींग ओळखपत्र देण्यात आले. तरी सर्वानी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच जुन्या सभासदांनी नाममात्र वार्षीक वर्गणी मध्ये पुन्हा ग्रंथालयात सभासद व्हावे असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.