भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )बिहार राज्यातील ” बुद्धगया महाबोधी महाविहार ” मुक्त करा , अशी मागणी घेऊन आज मंगळवार दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष दिपक गायकवाड व जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य कार्यकर्ते व महिला भगिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे धडक देऊन देशाचे मान. राष्ट्रपती महोदय यांच्या कडे निवेदन पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले.
” बुद्धगया महाबोधी महाविहार ” हे संपूर्ण जगातील बौध्द बांधवांच अतिशय महत्वाच ” प्रेरणादायी प्रार्थना स्थळ ” असून त्याला ऐतिहासिक दर्जा आहे . देशाबरोबर जगभरातील अनुयायंच्या भावना याच्याशी जोडल्या आहेत , त्या अनुषंगाने येथील बौद्ध महाविहाराचे ” पावित्र्य ” जपणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे , परंतु ह्या महाविहारामध्ये अनेक अश्या घटना घडत आहेत कि यामुळे विहाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे . बौद्ध धम्म हा ” विज्ञानावर ” आधारित असताना अशा पवित्र ठिकाणी ” अंधश्रध्येला ” खत पाणी घालण्याचे काम बऱ्याच वर्षांपासून होत आहे , आणि हा प्रकार दिवसांदिवेस वाढत चालला आहे , आणि ह्या सर्वांचेच कारण म्हणजे तेथील असलेला ” व्यवस्थापन समिती कायदा 1949 ” हा आहे . ह्या कायद्यामुळे तेथील व्यवस्थापन समितीतील बौद्धभिक्षु व्यतिरिक्त इतर सदस्य महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येईल , अशा गोष्टी सातत्याने करीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन तमाम बौद्ध भिक्षुगण आणि बौद्ध बांधव येथे अस्तित्वात असलेला व्यवस्थापन समिती कायदा 1949 रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षुनकडे देण्यात यावे , याकरिता भिक्षुगण गेली 21 दिवस उपोषण करीत आहेत.
मात्र याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील बौद्ध बांधवाना आव्हान करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड , महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली मा.महामाहीम राष्ट्रपती ,भारत सरकार यांना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले , व तात्काळ तेथील आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अन्यथा संपूर्ण देशात तीव्र आंदोलने करण्यात येथील याची शासनाने नोंद घ्यावी , असे निवेदन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे . आपले निवेदन मा.राष्ट्रपती पर्यंत पोहचवाण्याचे आश्वासन मा. जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड , महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , संघटक राहुल गायकवाड , उपाध्यक्ष देवेंद्र कोळी , चंद्रकांत साळुंखे , सदस्य अशोक वाघमारे , सुनील आप्पा गायकवाड , कर्जत ता. अध्यक्ष प्रदीप ढोले , कर्जत शहर अध्यक्ष लोकेश यादव , शैलेश खोब्रागडे , खोपोली अध्यक्ष सुमित जाधव , सुधागड ता. अध्यक्ष स्वप्नील गायकवाड , खालापूर महासचिव उत्तम ओव्हाळ , पंकज गायकवाड , पनवेल शहर अध्यक्षा छायाताई शिरसाठ , खांदा कॉलनी अध्यक्षा कविताताई वाघमारे , तायडे गुरुजी , प्रफुल कदम , गणेश बनसोडे , भगवान खंडागळे , विठ्ठल पवार , सुभाष गायकवाड , चंद्रकांत जगताप , तुकाराम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि सदस्य , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .