Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळवडगांव मावळ मोरया प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद…

वडगांव मावळ मोरया प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद…

मावळ (प्रतिनिधी): मोरया प्रतिष्ठान व सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या वतीने रविवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात वडगाव शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभागी होऊन मोफत औषधे व उपचार घेतले.
महाआरोग्य शिबिर भव्य स्वरूपात राबविण्यात येत असताना येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथकातील स्वयंसेवकाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी करून तसेच मदत कक्षाद्वारे रुग्णांना आवश्यक ते सहकार्य केले जात होते.
मोरया प्रतिष्ठान व सनराइज मेडिकल फाउंडेशन ने आयोजित केलेल्या महाशिबीरात आदित्य बिर्ला हॉस्पिटल, रुबी एलकेअर हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, इंडियन डेंटल असोसिएशन, डी वाय पाटील हॉस्पिटल, फिनिक्स हॉस्पिटल, डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, TGH आँन्को लाईप कॅन्सर सेंटर, साईदीप, स्पर्श अशी विविध नामांकीत रुग्णालये शिबिरात सहभागी झाली होती. शिबीरात प्रत्येक हॉस्पिटलचे वेगवेगळे विभाग केले असल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करून रुग्णांना तत्काळ मोफत औषधे व उपचार उपलबध करून देण्यात सोपे होत होते.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, सनराइज् मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे, तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते अपंग रुग्णांना मोफत व्हिल चेअर आणि वाॅकर चे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते मंगेश ढोरे, चंदुकाका ढोरे, सुनिल चव्हाण, गोरख ढोरे, अर्जुन ढोरे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, शारदा ढोरे, माया चव्हाण, रा. युवक अध्यक्ष अतुल वायकर, सचिन कडू, नितीन चव्हाण, सुरेश जांभुळकर, युवराज ढोरे, सिद्धेश ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठान संचालिका, मोरया ढोल पथक सभासद, पत्रकार बांधव, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शिबिरात शहरातील सुमारे 700 रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असता यातील एकूण 570 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.शहरातील नागरिकांनी आरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना हृदय, अन्ननलिका, मोतीबिंदू, हाडाचे फ्रॅक्चर कान नाक घसा, मुतखडा, सांधे, अपेंडिक्स, मुळव्याध, दंतचिकित्सा, हर्निया, पित्ताशय व पित्ताशयातील खडे, मूत्रशयाचे कॅन्सर, गर्भाशयातील गाठी डोळ्यांच्या व मेंदूच्या इत्यादी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार पुणे व पिंपरी चिंचवड तसेच मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अतिशय अत्यल्प दरात पुढील दिवसांत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे, आणि सनराइज फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page