मावळ (प्रतिनिधी):वडगाव शहरातील माळीनगर भागात एकाच घरातील तीन लहान भावंडे बेपत्ता झाल्याची घटना दि.31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8:00 वा. च्या सुमारास उघडकीस आली.याबाबत मुलांचे अपहरण झाले असावे अशी शंका व्यक्त करत मुलांच्या पालकांनी या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
या तीनही मुलांचा शोध सुरु असताना ती मुले एकविरा देवी गडाच्या पार्किंग मध्ये दिसून आल्याचा फोन स्थानिक दुकानदारांकडून वेहेरगाव चे पोलीस पाटील अनिल पडवळ यांना आला.
पोलीस पाटील पडवळ यांनी त्या मुलांना चहा नाश्ता देऊन, मुलांना विश्वासात घेत लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या साहाय्याने वडगांव मावळ पोलिसांना कळविले त्यानंतर वडगांव मावळ पोलिस ठाण्याचे म. पीएसआय ऋतुजा मोहिते यांनी येऊन त्या तीनही मुलांना ताब्यात घेतले व सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.