Tuesday, December 3, 2024
Homeपुणेवडगाववडगाव मावळ मधून पंक्चर टोळी गजाआड ,वडगाव पोलिसांची कामगिरी..

वडगाव मावळ मधून पंक्चर टोळी गजाआड ,वडगाव पोलिसांची कामगिरी..

वडगाव मावळ : तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून पंक्चर दुकानदार टोळीकडून वाहन चालकांची फसवणूक करुन 9,400 रुपयांची आर्थिक लूट व नुकसान केल्याची घटना सोमवारी ( दि . 27 ) रात्री 9 वा . जुन्या पुणे – मुंबई महामार्गालगत शितल हॉटेल समोर शहानवाज टायर शॉप , वडगाव ता . मावळ जि . पुणे हद्दीत घडली .याबाबत पियुष अशोककुमार आरोरा ( वय 29 , रा . सी . विंग आँरचिड लोढा गोल्डन ड्रिम कोनीगाव डोबिवली , ( E ) ठाणे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

यानुसार अब्दुल रहिम राशिद , राशीद अब्दुल रहिम अली रा . वडगाव मावळ , मूळ राहणार कानपूर उत्तर प्रदेश ) व इतर सहा जणांवर भा.द.वि.स.क 420,417,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पियुष अशोककुमार आरोरा व संतोष आण्णाराव बनसोडे वय 29 , बोराळे ता . मंगळवेढा जि.सोलापुर ) हे जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरून जात असताना , दुचाकीवरून अनोळखी दोन तरुण आले व तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून निघून म्हणून ते शहानवाज टायर शॉप , वडगाव ता . मावळ येथे गेले असता , पियुष आरोरा यांच्या TS 08 HE 2089 दुचाकीचे पंक्चर नसताना 1500 रुपये पंक्चर काढल्याचे व टायर चे 3500 एकूण 5000 रुपयांचे नुकसान व फसवणूक व संतोष बनसोडे यांच्या MH 13 DK 9370 दुचाकीचे पंक्चर नसताना 400 रुपये पंक्चर काढल्याचे व टायर चे 4000 रुपयांचे नुकसान व फसवणूक केली आहे.

गेले काही दिवसांपासून पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड , सोमाटणे , वडगाव , वरसोली आदी ठिकाणी पंक्चर टोळी कार्यरत आहेत . बाहेरच्या दुचाकी व चारचाकी ओळखून त्यांच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगून फसवणूक व नुकसान केले जात आहे . याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होती . पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले , पोलीस अंमलदार मनोज कदम , सिद्धार्थ वाघमारे , गणपत होले , आशिष काळे आदींनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

सदर आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात रवाना करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अजित ननवरे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page