वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोऱ्हाडे वस्ती जवळ एका व्यक्तीच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्याची हत्या केल्याची घटना बुधवारी ( दि.16 ) रोजी रात्री साडेनऊ वाजन्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार ज्ञानोबा पांडुरंग मुजुमले (वय 45,रा . उंडणपूर ता . हवेली ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यातील दुसरी हत्त्या असल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
सदर हत्तेबाबत वडगाव मावळ पोलिसांना दोन संशयित व्यक्तिंची नावे प्राप्त झाली असून या संदर्भात पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.