Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडवदप गावातील " स्वप्नील श्याम रोकडे " यांना " डॉक्टर " पदवी...

वदप गावातील ” स्वप्नील श्याम रोकडे ” यांना ” डॉक्टर ” पदवी प्रदान !

” आई वडिलांचे ” स्वप्न केले साकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” जा आपल्या घराच्या भिंतींवर लिहून ठेवा , की या देशातील शासनकर्ती जमात तुम्हाला व्हायचं आहे ” , शिक्षणाने तुमच्या पुढील पिढी ” सक्षम ” होईल , व तुमच्या ” अज्ञानाची गुलामगिरी ” संपुष्टात येईल , असा महान संदेश देणारे ” महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांचे विचार प्रत्यक्षात उतरवून शिक्षणात ” गरुड भरारी ” घेणारे कर्जत तालुक्यातील वदप या गावातील ” स्वप्नील श्याम रोकडे ” यांना ” डॉक्टर ” हि सर्वोच्च पदवी प्रिन्सिपॉल डॉ.अदिती पिंपळखारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली . हा पदवीदान समारंभ कल्याण येथे सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी ” वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या ” दिवशी संपन्न झाला . यावेळी B.R. हर्णे आयुर्वेदिक कॉलेज काराव या कॉलेजचे प्रिन्सिपॉल व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील वदप या ग्रामीण भागात राहणारे श्याम संभाजी रोकडे हे राजिप च्या आरोग्य विभाग कळंब – कर्जत येथे सरकारी नोकरीत आहेत , तर आई सुनिता श्याम रोकडे या गृहिणी असताना त्यांचा मुलगा स्वप्निल लहानपणा पासूनच हुशार होता . इयत्ता १ ली ते ४ थी शिशु मंदिर – कर्जत , ५ वी ते १० वी शारदा मंदिर – कर्जत, १० वी ते १२ वी CHM कॉलेज उल्हासनगर व चांगल्या मार्कांनी व niit परीक्षेत यश सम्पादन करुन सन २०१९ ला बी . आर. हर्णे आयुर्वेदिक कॉलेज – वांगणी येथे डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला . अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २०२५ साली चांगल्या मार्कांनी यश संपादन करुन सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर , phc नेरळ व हर्णे कॉलेज येथे इंटर्नशिप करुन आज रोजी पदवीदान समारंभात स्वप्नील रोकडे यांना ” डॉक्टर ” ही पदवी देण्यात आली.

त्यांच्या डॉक्टर होण्याने कर्जतमध्ये एका होतकरू डॉक्टरचे आगमन होणार असल्याने रायगड जिल्ह्याबरोबरच कर्जत तालुक्याचे , वदप गावाचे नाव रोशन झाले आहे . स्वप्निल यांच्या घरात वडील श्याम संभाजी रोकडे हे आरोग्य सहाय्यक कळंब , तर काका शरद रोकडे हे सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर कर्जत येथे कार्यरत आहेत . स्वप्निल हे डॉक्टर झाल्याने आई सुनिता , वडील श्याम , तर काका शरद रोकडे यांचे स्वप्न त्यांनी साकार केले असून त्यांना कर्जत – खालापूर तालुक्यातील राजकीय – शैक्षणिक – धार्मिक – सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर , कौटुंबिक सदस्य , मित्र परिवार , बहुजन वर्ग व बौद्ध बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

माझ्या या ” डॉक्टर ” होण्याच्या यशात माझे वडील , आई , काका यांचे संस्कार तसेच कुटुंबातील सदस्य , माझे शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे ” डॉ. स्वप्निल श्याम रोकडे ” यांनी सांगितले .
- Advertisment -

You cannot copy content of this page