Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळवन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून साप व वन्यप्राण्यांविषयी जनजागृती..

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून साप व वन्यप्राण्यांविषयी जनजागृती..

मावळb(प्रतिनिधी): पावसाळ्यात सर्पदंश टाळा यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने तळेगाव MIDC येथील “बोर्ग वॉर्नर” या कंपनीतील 40 कामगारांना सर्प विषयी आणि इतर प्राणी विषयी जनजागृती करण्यात आली.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विकी दौंडकर, जिगर सोलंकी, आदेश मुथा यांनी कंपनीत जाऊन सर्प आणि इतर प्राण्याबद्दल जागृती केली.मावळ तालुक्यात आढळणारे विषारी व बिनविषारी सापांचे प्रकार, त्यांना कसे ओळखू शकतो, साप चावल्यावरचे प्रथम उपचार, साप आपल्या परिसरात येऊ नये यासाठीच्या उपाय योजना,सापांचे आपल्याला होणारे फायदे या विषयांवर चर्चा करत लोकांमध्ये सापांच्या प्रती असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यात आले.
यावेळी विविध सर्प जातीविषयी संपूर्ण माहिती त्या कामगारांना पूर्णपणे कळेल यासाठी जिगर सोलंकी यांनी मार्गदर्शन करताना,आपल्या मावळात 36-37 प्रकारचे साप आढळून येतात, त्यातले 4 साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे) हे मानव वस्ती मध्ये जास्त करून आढळुन येतात आणि या सापांमुळे मावळ तालुक्यात आधिक प्रमाणात सर्पदंश होतात. आता पावसाळा सुरू आहे.
यात भरपूर सापांची पिल्लं आढळुन येतात, तरी आपण काम करताना काळजी घेतली पाहिजे, पायात बुटांचा वापर केला पाहिजे, रात्रीची टॉर्च वापरली पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे जेणे करून मानव आणि सर्प संघर्ष कमी होऊ शकेल.आणि सर्प दंश झाल्यावर त्वरित जवळ पासच्या दवाखान्यात जाणे आणि उपचार घेणे. असे जिगर सोलंकी यांनी बोलताना सांगितले.
त्यावर कोणता ही वन्य प्राणी आम्ही मारणार नाही, किंवा त्यास इजा करणार नाही. तसेच वन्यप्राणी आम्ही वाचवू असे आश्र्वासन “बोर्ग वॉर्नर कंपनी” कडून यावेळी करण्यात आले.
तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे,व अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी सांगितले की मावळ तालुक्यात सापांचे प्रमाण खूप जास्त आहे तरी आपण काळजी घ्यावी आणि कोणाला ही शाळेत, कंपनीत, गावा मध्ये जनजागृति करावयाची असल्यास असेल तर (98225 55004) या क्र.संपर्क साधावा. अथवा वन विभागाला कळवावे.
- Advertisment -

You cannot copy content of this page